मेटाद्वारे समर्थित हे प्लॅटफॉर्म आता फक्त त्या डिव्हाइसेसवर काम करेल जे iOS 15.1 किंवा Android 5.1 सारख्या किमान किंवा नवीन सॉफ्टवेअर व्हर्जनवर चालत आहेत. म्हणजेच, जर तुमचा फोन यापेक्षा जुन्या व्हर्जनवर काम करत असेल, तर तुम्ही त्यात व्हॉट्सअॅपचे मेसेजिंग किंवा कॉलिंग सारखी फीचर्स वापरू शकणार नाही.
हे आहेत टॉप 5 AI Apps, याच्या मदतीने तुम्ही दरमहा करु शकता हजारोंची कमाई
advertisement
आयफोनबद्दल बोलायचे झाले तर, आयफोन 5s, आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लस सारखे मॉडेल आता व्हॉट्सअॅपच्या बाहेर असतील कारण ते लेटेस्ट iOS आवृत्तीला सपोर्ट करत नाहीत. तसंच, आयफोन 6s, 6s Plus आणि पहिला आयफोन SE अजूनही वापरता येतो कारण ते अपडेट केले जाऊ शकतात. दुसरीकडे, Samsung Galaxy S4, Note 3, Sony Xperia Z1, LG G2, Huawei Ascend P6, Moto G (पहिली पिढी) आणि HTC One X सारखे अँड्रॉइड फोन आता व्हॉट्सअॅपसह काम करणार नाहीत. एकूणच, व्हॉट्सअॅप आता अँड्रॉइड 5.0 किंवा त्याहून जुन्या व्हर्जन असलेल्या कोणत्याही फोनवर काम करणार नाही.
तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की तुमचा फोन या लिस्टमध्ये आहे की नाही, तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या डिव्हाइसची ऑपरेटिंग सिस्टम व्हर्जन तपासावं लागेल. आयफोन यूझर्स सेटिंग्जमध्ये "जनरल" आणि नंतर "अबाउट" विभागात जाऊन iOS आवृत्ती तपासू शकतात. अँड्रॉइड यूझर्स सेटिंग्जमध्ये "अबाउट फोन" मध्ये जाऊन त्यांच्या सॉफ्टवेअर व्हर्जनविषयी माहिती मिळवू शकतात.
तुमचं Facebook अकाउंट वापर दुसरं कोणी तर करत नाहीये? असं करा चेक
WhatsAppसारखे अॅप्स वेळोवेळी त्यांची सिस्टम आणि फीचर्स सुधारण्यासाठी जुन्या डिव्हाइसेसना सपोर्ट करणे थांबवतात. मेटा म्हणते की दरवर्षी ते कोणते डिव्हाइसेस आणि ऑपरेटिंग सिस्टम आता जुने आहेत याचे मूल्यांकन करतात, ज्यामध्ये आवश्यक सुरक्षा अपडेट नाहीत किंवा ते अॅपच्या लेटेस्ट फीचर्सना सपोर्ट करू शकत नाहीत.
अशा उपकरणांसाठी सपोर्ट बंद करून, WhatsApp त्यांच्या उर्वरित यूझर्सना चांगली सुरक्षा, चांगले कार्यप्रदर्शन आणि नवीन फीचर्सचा अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करते.
तुम्हाला तुमच्या फोनवर WhatsApp सुरळीत न थांबता काम करायचे असेल. तर तुमचा फोन अप-टू-डेट असणे महत्वाचे आहे. जर तुमच्या डिव्हाइसला नवीन व्हर्जन मिळत नसेल, तर तुम्हाला नवीन फोन खरेदी करण्याचा पर्याय देखील निवडावा लागू शकतो. सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आज एक गरज बनली आहे.
