TRENDING:

कोणत्या फोनचा कॅमेरा आहे सर्वात बेस्ट? टेस्टमधील खुलासा पाहून व्हाल हैराण

Last Updated:

अ‍ॅपल, सॅमसंग, वनप्लस यांसारख्या कंपन्यांच्या फोनमधील कॅमेरे अतिशय हाय क्वॉलिटीचे मानले जातात. या फोनमधील सेल्फी (फ्रंट) कॅमेरा देखील चांगले आहेत. पण, कोणत्या फोनमधून सर्वात चांगला सेल्फी काढता येतो

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजकाल इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे युजर्सना चांगल्या क्वॉलिटीचे फोटो पाहिजे असतात. युजर्सची ही गरज लक्षात घेऊन जवळपास सर्वच स्मार्टफोनमध्ये चांगल्या क्वॉलिटीचा कॅमेरा सेटअप दिला जात आहे. अ‍ॅपल, सॅमसंग, वनप्लस यांसारख्या कंपन्यांच्या फोनमधील कॅमेरे अतिशय हाय क्वॉलिटीचे मानले जातात. या फोनमधील सेल्फी (फ्रंट) कॅमेरा देखील चांगले आहेत. पण, कोणत्या फोनमधून सर्वात चांगला सेल्फी काढता येतो, हे तुम्हाला माहिती आहे का? DxOMark या टेस्टिंग कंपनीने विविध फोनच्या सेल्फी कॅमेऱ्यांची चाचणी केली आहे.
कोणत्या फोनचा कॅमेरा बेस्ट
कोणत्या फोनचा कॅमेरा बेस्ट
advertisement

DxOMarkने केलेल्या चाचणीतील निष्कर्षांनुसार, आयफोन 16 प्रो मॅक्समधील सेल्फी कॅमेरा सर्वांत चांगला आहे. फोनमधील ऑटोफोकसदेखील खूप चांगलं कार्य करतो. फोनच्या सेल्फी कॅमेऱ्याने चांगले फोटो आणि व्हिडिओ शूट करता येतात. आयफोन 16 प्रो मॅक्समधील कॅमेरा सेटअप थोड्याफार फरकाने मागील वर्षीच्या फोनप्रमाणेच आहे. मात्र, सॉफ्टवेअरमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. गुगल पिक्सेल 9 प्रो XL, ऑनर मॅजिक 6 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्सशी देखील आयफोन 16 प्रो मॅक्सच्या फ्रंट कॅमेऱ्याची तुलना केली गेली.

advertisement

आयफोन 16 प्रो मॅक्समध्ये 12-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन कमी प्रकाशातसुद्धा चांगले फोटो कॅप्चर करू शकतो. ऑटोफोकस चांगला असल्याने 4K व्हिडिओ देखील शूट करता येतात. या फोनच्या सेल्फी कॅमेऱ्याने फोटो काढल्यास चेहऱ्यावरील सूक्ष्म बारकावेदेखील कॅप्चर होतात. सेल्फी कॅमेऱ्यातील बोकेह मोड (Bokeh) देखील खूप चांगला आहे. त्यामुळे फोटो आणखी चांगले दिसतात.

advertisement

आयफोन 15 प्रो मॅक्सच्या तुलनेत 16 प्रो मॅक्समधील फोटोंची कलर क्वॉलिटी जास्त चांगली आहे. पण, आयफोन 16 प्रो मॅक्स आणि गुगल पिक्सेल 9 प्रो XLची तुलना केल्यास फोटोंच्या कलर क्वॉलिटीबाबत गुगलचा फोन काहीसा उजवा ठरतो.

आयफोन 16 प्रो मॅक्स हे 'अ‍ॅपल'च्या 16 सीरिजमधील टॉप मॉडेल आहे. त्याची किंमत 1 लाख 84 हजार 900 रुपये आहे. नवीन आयफोन सीरिजमध्ये कंपनीने कॅमेरामध्ये एआय फीचर्ससह बरीच आधुनिक वैशिष्ट्ये दिली आहेत. या सीरिजमधील सर्व मॉडेल्स डेडिकेटेड कॅप्चर बटणासह मिळत आहेत. हे बटण प्रेस केल्यानंतर अगदी सहज उत्तम फोटो क्लिक होतो.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
कोणत्या फोनचा कॅमेरा आहे सर्वात बेस्ट? टेस्टमधील खुलासा पाहून व्हाल हैराण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल