ॲफिलिएट मार्केटिंग
WhatsAppवरून पैसे कमवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. यामध्ये, तुम्ही फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन सारख्या कंपन्यांच्या ॲफिलिएट प्रोग्रामसाठी साइन अप करू शकता आणि त्यांच्या उत्पादनांच्या लिंक्स तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुप किंवा स्टेटसवर पोस्ट करू शकता. जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती त्या लिंकचा वापर करून खरेदी करते तेव्हा तुम्हाला एक विशिष्ट कमिशन मिळेल.
advertisement
ट्रेडिंग करताना सावधान! 52 वर्षीय व्यक्तीला सायबर क्रिमिनल्सने लावला 2.36 कोटींचा चुना
पेड व्हॉट्सअॅप ग्रुप
WhatsApp वर पेड ग्रुप तयार करूनही पैसे कमवता येतात. तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील तज्ञ किंवा छंदवादी असाल, तर तुम्ही एक कम्युनिटी तयार करू शकता. यामध्ये, विशेष कंटेंट किंवा अशा कोणत्याही सल्ल्यासाठी सदस्याकडून सब्सक्रिप्शन फीस आकारले जाऊ शकते.
अॅप रेफरल
तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबातील सदस्यांना अॅप्स रेफर करून पैसे कमवू शकता. खरंतर, अनेक अॅप्स रेफरलवर चांगले पैसे देतात. तुम्ही या अॅप्सच्या लिंक्स तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासह तसेच तुमच्या ग्रुप सदस्यांसोबत व्हाट्सअॅपद्वारे शेअर करू शकता. जेव्हा कोणी त्या लिंकवरून अॅप डाउनलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचे रेफरल रिवॉर्ड मिळेल.
Amazonचा मोठा निर्णय! 20 ऑगस्टपासून बंद होणार ही सुविधा, यूझर्सना धक्का
प्रोडक्ट विकून नफा मिळवा
तुम्ही कोणतेही प्रोडक्ट बनवले तर तुम्ही ते व्हाट्सअॅपद्वारे विकू शकता. व्हाट्सअॅप बिझनेस अकाउंटद्वारे तुम्ही तुमचे प्रोडक्ट तुमच्या संभाव्य ग्राहकांना पोहोचवू शकता. याशिवाय, तुम्ही व्हाट्सअॅप स्टेटस किंवा ब्रॉडकास्ट मेसेजद्वारे ग्राहकांना तुमच्या प्रोडक्टची माहिती देखील देऊ शकता.
व्हाट्सअॅपद्वारे कायदेशीररित्या पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. खरंतर, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, अनेक सायबर गुन्हेगार ऑनलाइन कमाईचे आमिष दाखवून लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत, जर कोणी तुम्हाला व्हाट्सअॅपद्वारे पैसे कमवण्याचे आमिष दाखवत असेल तर तुम्ही काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या प्रभावाखाली येऊ नका.
