हे टूल भाषेचा अडथळा दूर करेल
क्रिएटर्सना जागतिक प्रेक्षकांशी जोडण्यात आणि भाषेतील अडथळे दूर करण्यात मदत करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. फीचर्समागील टेक्नॉलॉजी Aloud मधून आली आहे, ही डबिंग सर्व्हिस आहे. जी Google च्या Area 120 इनक्यूबेटर अंतर्गत एक छोटासा प्रयोग म्हणून सुरू झाली. नवीन साधनासह, कंपनी या भाषेतील अडथळे दूर करण्याचा आणि YouTube कटेंट प्रत्येकासाठी आणण्याचा विचार करत आहे. तुम्ही कोठून आहात किंवा तुम्ही कोणती भाषा बोलता हे महत्त्वाचे नाही. या टूलद्वारे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ समजून घेऊ शकाल.
advertisement
Tata चा इंटरनेट प्लॅन आहे जबरदस्त! Free मध्ये मिळतोय OTT चा आनंद
व्हिडिओ या भाषांमध्ये बदलेल
YouTubeने नुकतेच एका ब्लॉग पोस्टमध्ये हे फीचर सादर केले आहे. एक व्हिडिओ फ्रेंचमधून इंग्रजीत, दुसरा हिंदीतून इंग्रजीमध्ये डब करण्यात आला आणि तिसरा व्हिडिओ आता इंग्रजी (मूळ), हिंदी, पोर्तुगीज, स्पॅनिश, जपानी, इटालियन, जर्मन, फ्रेंच आणि इंडोनेशियन यासह नऊ वेगवेगळ्या भाषांमध्ये चेंज करण्यात आला. ही सुविधा जगभरातील क्रिएटर्ससाठी उपलब्ध आहे, खरंतर YouTube ने सध्या ते केवळ निवडक व्हिडिओंमध्ये अॅड केले आहे.
Barcode आणि QR Code मध्ये फरक काय? फार कमी लोकांना माहित असेल बरोबर उत्तर
AI टूल लिप-सिंक करू शकत नाही
डब केलेला ऑडिओ स्पीकरच्या ओठांच्या हालचालींशी जुळत नाही, म्हणजेच हे एआय टूल लिप-सिंक करू शकत नाही, परंतु तरीही ते खूप चांगले आहे. स्वयंपाकाच्या व्हिडिओंसारख्या वेगवान व्हिडिओंमध्येही डबिंग चांगले काम करते. सध्या, YouTube भागीदार कार्यक्रमाचा भाग असलेल्या आणि ज्ञान आणि शैक्षणिक व्हिडिओ शेअर करणाऱ्या निर्मात्यांना Automatic Dubbing उपलब्ध आहे. यूट्यूबचे म्हणणे आहे की, हे एआय टूल पुढील अपडेटमध्ये इतर प्रकारच्या व्हिडिओंनाही सपोर्ट करेल.