Tata चा इंटरनेट प्लॅन आहे जबरदस्त! Free मध्ये मिळतोय OTT चा आनंद
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Tata Play Fiber ने एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. ज्यामध्ये यूजरला 100 Mbps स्पीड मिळेल आणि त्यासोबत OTT देखील फ्री मिळेल. प्लॅनची व्हॅलिडिटी काय आहे आणि तुम्ही त्याला कितीमध्ये सब्सक्राइब करु शकता चला जाणून घेऊया.
मुंबई : नवीन ऑफर्समुळे टाटा प्ले फायबर बऱ्याचदा ट्रेंडमध्ये राहतो. अलीकडेच कंपनीने एक ब्रॉडबँड प्लॅन लॉन्च केला आहे, जो खूप चर्चेत आहे. कारण कंपनीने 100 Mbps ब्रॉडबँड प्लॅनसह फ्री OTT चा आनंद देणारा प्लॅन सुरू केला आहे. हा प्लॅन किती किमतीत खरेदी केला जाऊ शकतो आणि त्याची व्हॅलिडिटी किती आहे चला जाणून घेऊया.
टाटा प्ले फायबरचे मुंबई, बेंगळुरू आणि दिल्ली येथे कनेक्शन आहेत. टाटा प्ले फायबर प्लॅन हा एक प्रीपेड प्लॅन आहे, जो 1 महिना, 3 महिने, 6 महिने आणि 12 महिन्यांच्या व्हॅलिडिटीसह येतो आणि त्याचे चार्जेस व्हॅलिडिटीनुसार वेगवेगळे असतात. तुम्हाला 900 रुपये प्रति महिना दराने 1 महिन्याचा ओटीटी प्लॅन मिळेल. त्याच वेळी, जर तुम्हाला OTT ची सुविधा नको असेल तर तुम्हाला त्यासाठी कमी पैसे द्यावे लागतील.
advertisement
प्लॅननुसार डिस्काउंट
टाटा प्ले फायबर प्लॅनमध्ये दोन प्रकारच्या प्लॅन्सचा समावेश आहे, 100 एमबीपीएस प्राइम प्लॅन आणि मेगा प्लॅन. या प्लॅनमध्ये युजरला वेगवेगळे फायदे मिळतील आणि त्यांच्या किमतीही वेगळ्या आहेत. तुम्ही या प्लॅन्स अंतर्गत 12 महिन्यांसाठी सबस्क्रिप्शन घेतल्यास, तुम्हाला त्यावर चांगली सूट मिळेल. जर तुम्हाला त्याचा लाईट प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्हाला दरमहा 750 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर हा प्लॅन एका वर्षासाठी खरेदी करण्यासाठी तुम्हाला जीएसटीसह 9000 रुपये द्यावे लागतील. यामध्ये यूजर्सना OTT फायदे देखील मिळणार आहेत.
advertisement
6 OTT ऑप्शन असणारे प्लॅन्स
त्याच वेळी, Tata Play Fiber चा 100 Mbps प्लॅन देखील उत्तम आहे. यासाठी युजरला दरमहा 800 रुपये द्यावे लागतील. याशिवाय, जर तुम्हाला त्याचे वार्षिक सबस्क्रिप्शन घ्यायचे असेल, तर तुम्हाला जीएसटीसह 9600 रुपयांमध्ये खरेदी करावे लागेल. यामध्ये यूझर्सना 6 OTT प्लॅटफॉर्म तसेच 200 हून अधिक टीव्ही चॅनेलमधून निवड करण्याचा ऑप्शन मिळेल.
advertisement
यासोबत टाटा प्ले फायबरचा एक मेगा प्लॅन आहे. ज्यासाठी यूजर्सना दरमहा 950 रुपये द्यावे लागतील. एका वर्षासाठी हा प्लॅन खरेदी करण्यासाठी तुम्हाला जीएसटीसह 11,400 रुपये द्यावे लागतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2024 12:07 PM IST