Facebook Down: रात्रीस खेळ चाले, फेसबुकसह Instagram, WhatsApp पडलं बंद
- Published by:sachin Salve
Last Updated:
जगभरात फेसबुक सेवा अचानक ठप्प झाली. त्यापाठोपाठ इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपही बंद पडलं आहे.
मुंबई : सरत्या वर्षाच्या अखेरच्या महिन्यात पुन्हा एकदा फेसबुकला धक्का बसला आहे. जगभरात फेसबुक सेवा अचानक ठप्प झाली. त्यापाठोपाठ इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपही बंद पडलं आहे. डेस्कटॉपवर फेसबुक लॉग इन होत नाहीये. तर व्हॉट्सअपच्या बाबतीतही तेच घडलं आहे. मेसेज अजिबात सेंड होत नाही. कनेक्शन हे डाऊन झालं आहे. तर दुसरीकडे इंस्टाग्रामसोबतही असाचा प्रकार घडला आहे. इंस्टाग्रामवर एकही रिल पाहता येत नाही. तर काही जणांसोबत इंस्टाग्राम अॅप ओपन होत नाहीये.
मेटाच्या मालकीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम हे प्रसिद्ध सोशल मीडिया ऍप्स आहेत. ज्यावर लोक आपला बहुतांश वेळ घालवतात. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लोक फेसबुक आणि इंस्टाग्रामवर स्क्रोल करत असतात. तसेच काही ना काही पोस्ट करत असतात. त्यामुळे असे अनेक लोक आहेत, जे यांच्या शिवाय राहूच शकत नाही. पण अचानक बुधवारी रात्री मेटाची सेवा ठप्प झाली.
advertisement
मेटा का बंद पडलं, याचं कारण कळू शकलेलं नाही, परंतू यामुळे ट्वीटरवर मात्र मीम्सचा पाऊस पडत आहे. मेटा का बंद झालं हे जाणून घेण्यासाठी अचानक ट्वीटर म्हणजेच X वर गर्दी केली आहे. इथे #facebookdown, #instagramdown असा हॅशटॅग देखील ट्रेंड होऊ लागला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 11, 2024 11:41 PM IST