YouTube Premium Lite ची किंमत किती आहे ते जाणून घेऊया
YouTube Premium Lite प्लॅनची किंमत दरमहा फक्त ₹89 आहे. कंपनी त्यांच्या यूझर्सना या प्लॅनसह बातम्या, गेमिंग, फॅशन आणि सौंदर्य अशा विविध श्रेणींमध्ये जाहिरात-मुक्त व्हिडिओ पाहण्याची संधी देत आहे. ही किंमत YouTube Premium च्या विद्यार्थी योजनेसारखीच आहे. याचा अर्थ तुम्ही ₹90 पेक्षा कमी किमतीत तुमचा व्हिडिओ पाहण्याचा अनुभव अधिक आनंददायी बनवू शकता.
advertisement
Amazon Festivalमध्ये थेट 50% डिस्काउंट! Alexaसह या स्मार्ट डिव्हायसेसवर बंपर बचत
YouTube Music असेल अॅड फ्री
तसंच हे लक्षात ठेवावे की, कंपनी या YouTube Premium Lite प्लॅनमध्ये YouTube Music देत नाही. हा प्लॅन फक्त व्हिडिओ पाहणाऱ्यांसाठी आहे. जर तुम्ही म्यूझिक ऐकत असाल, तर त्या दरम्यान दिसणारे व्हिडिओ पूर्वीप्रमाणेच प्ले होतील. शिवाय, या प्लॅनमध्ये बॅकग्राउंड प्लेबॅक, ऑफलाइन प्लेबॅक आणि डाउनलोड्स सारखी फीचर्स नाहीत.
फोनमध्ये नेहमीच नेटवर्क प्रॉब्लम येतो का? या ट्रिक्सने प्रॉब्लम होईल दूर, एकदा पाहाच
या प्रकरणात जाहिराती दिसू शकतात
या नवीन प्लॅनसह, अॅड फ्री व्हिडिओ प्लेबॅकचा आनंद केवळ स्मार्टफोनवरच नाही तर स्मार्ट टीव्ही, कंप्यूटर आणि लॅपटॉप सारख्या डिव्हाइसवर देखील घेता येईल. शिवाय, कंपनीने असेही स्पष्ट केले आहे की, यूझर्सने म्यूझिकशी संगीताशी संबंधित व्हिडिओ किंवा कंटेंट पाहिल्यास कधीकधी जाहिराती दिसू शकतात. याचा अर्थ हा पूर्णपणे अॅड फ्री एक्सपीरियन्स असणार नाही.
हे YouTube प्लॅन देखील बेस्ट
YouTube चा नवीन Premium Lite प्लॅन अगदी परवडणारा मानला जाऊ शकतो, जर तुम्हाला पूर्णपणे अॅड फ्री अनुभव हवा असेल, तर कंपनी यासाठी अनेक प्लॅन देखील देते. तुम्ही ₹149 च्या पर्सनल प्लॅनमधून निवडू शकता. तुमच्याकडे ₹219 चा Duo प्लॅन, ₹299 चा फॅमिली प्लॅन आणि ₹1490 चा वार्षिक प्लॅनचा ऑप्शन देखील आहे.
या लोकांना केलं टार्गेट
एकंदरीत, कंपनी त्यांच्या YouTube प्रीमियम लाइट प्लॅनसह अशा यूझर्सना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे ज्यांना कमी किमतीच्या सबस्क्रिप्शनसह अॅड फ्री व्हिडिओ अनुभव हवा आहे. या प्रकरणात, ₹89 चा प्लॅन हा बेस्ट ऑप्शन आहे.