मानपाडा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत श्वानांचे पार्थिव पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले असून पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकलव्य ॲनिमल्स पेडिग्री कारखाना आहे. हा कुत्र्यांचं खाणं तयार करणारा कारखाना आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कंपनीच्या मालकांनी कारखाना आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पेस्ट कंट्रोल केलं होतं. यामुळे सात भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार प्राणी मित्र सुचित्रा सुर्वे यांनी दिली होती.
advertisement
सुचित्रा यांनी त्यांच्या एफआयआरमध्ये, एकलव्य ॲनिमल्स पेडिग्री कारखान्याच्या मालकावर, त्याच्या भावावर आणि कारखान्यातील एका कामगारावर यांनी कारखान्यात उंदीर मारण्याचे औषध टाकल्याचा आरोप केला होतं. गेल्या काही दिवसांपूर्वीच कारखान्याचे मालक विरेंद्र कुमार निशाद यांनी कारखान्यासह आजूबाजूच्या परिसरात पेस्ट कंट्रोल केलं होते. ते औषध खाऊनच भटक्या कुत्र्यांच्या मृत्यू झाल्याचा आरोप सुचित्रा यांचा आहे. इतकंच नाही तर त्यांनी एफआयआरमध्ये सुचित्रा आणि त्यांच्या पतीला कारखाना मालक आणि त्यांच्या कामगारांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुचित्रा कारखान्याच्या परिसरात राहत असून त्या 2021पासून परिसरातील भटक्या कुत्र्यांना खाऊ घालत आहे.
सुचित्रा सुर्वे यांनी कारखान्याच्या मालकासह तिघांविरोधात असा आरोप केला की, कारखान्याच्या परिसरामध्ये झालेल्या पेस्ट कंट्रोलचं औषध सात कुत्र्यांनी खाललं होतं. त्यापैकी चार कुत्र्यांचा लगेचच मृत्यू झाला होता. तर उर्वरित तीन कुत्र्यांचा नंतर मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, प्राणी मित्रांकडून दोषींवर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. आरोपींनी हे आरोप फेटाळून लावले असून, औद्योगिक परिसरात किटक नियंत्रण मोहीम राबवण्यात आल्याची माहिती देत आहेत. त्या प्रक्रियेदरम्यान वापरलेली विषारी रसायने कुत्र्यांनी खाल्ली असावीत, असे त्यांचे मत आहे. सुर्वे यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वीही अशाच पद्धतीने जवळपास 36 भटके कुत्रे आणि पाळीव कुत्रे मरण पावले आहेत. जेव्हा नागरिकांनी कारखान्याच्या मालकावर आरोप केले होते, तेव्हा त्यांनी सर्वांना धमक्या दिल्या होत्या.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वीरेंद्र निषाद, त्याचा भाऊ आणि आणखी एका कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांनी सांगितले की, कुत्र्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण निश्चित होईल. भटक्या कुत्र्यांना विषबाधा झाल्याची तक्रार आम्हाला मिळाली आहे. त्याचबरोबर, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी असेही म्हटले आहे की कीटकनाशक रसायनांमुळे कुत्र्यांचे मृत्यू झाल्यांचे सांगण्यात येत आहे. कुत्र्यांच्या पार्थिवांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. तपास सुरू असून दोषी आढळलेल्यांवर योग्य कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षकांनी दिली आहे.
