दिवा-सीएसएमटी लोकल लवकर सुरू अन् बुलेट ट्रेन...
डॉ. शिंदे म्हणाले की,दहा वर्षांपूर्वी दिवा हे केवळ गावासारखे होते. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था आणि रेल्वे स्थानकाची अवस्था अतिशय खराब होती. मात्र आज दिवा रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सोयी-सुविधा वाढल्या आहेत.
दिवा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने दर्जेदार शाळा, महाविद्यालये, रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविद्यालयांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात दिवा शहरात वैद्यकीय महाविद्यालयासारखे महत्त्वाचे प्रकल्प उभारण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
advertisement
रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी कल्याण रोड परिसरात टाटा कौशल्य विकास केंद्र उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील सहा ते सात महिन्यांत हे केंद्र सुरू होणार आहे. यामुळे स्थानिक तरुणांना कौशल्य प्रशिक्षण मिळून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच दिवा शहरात उद्योजक घडवण्यासाठी विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
मोठे आणि हक्काचे घर विनामूल्य मिळणार
क्लस्टर पुनर्विकास योजनेबाबत बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की, या योजनेअंतर्गत धोकादायक आणि अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हक्काचे, अधिकृत आणि मोठे घर विनामूल्य मिळणार आहे. ठाणे शहरात सध्या एकाचवेळी 13 क्लस्टर प्रकल्प सुरू असून दिवा शहरातील 95 टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असेही त्यांनी स्पष्ट केले
