TRENDING:

Traffic Rules : वाहनचालकांनो सावधान! ही एक चूक तुम्हाला भारी पडणार; परिवहन विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये

Last Updated:

Thane Traffic : ठाणे शहरात वाहन चालवताना आता वाहनचालकांना त्यांची एक चुक खुप महागात पडू शकते. नक्की कोणत्या गोष्टीमुळे वाहनचालकांना सावध राहिले पाहजे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : राज्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात रस्ते अपघातांच्या घटना वाढत आहेत. हे होणारे रस्ते अपघात थांबवण्यासाठी ठाण्यात एक नवीन पर्यास सोधून काढण्यात आलेला आहे.
Thane RTO helmet checking drive 2026 details
Thane RTO helmet checking drive 2026 details
advertisement

परिवहन विभागाची करडी नजर

रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. 2026 हे वर्ष राज्यभर 'दुचाकीचालक आणि पादचारी बचाव अभियान'म्हणून राबवले जाणार असून ठाणे परिवहन विभागाने या मोहिमेला सुरुवात केली आहे. आता हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्यांवर तात्काळ दंडाची कारवाई होणार आहे.

महाराष्ट्रात 2025 मध्ये 36,450 अपघात झाले असून 15,549 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 57 टक्के मृत्यू दुचाकीस्वारांचे तर 21 टक्के पादचाऱ्यांचे आहेत. ही चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन हेल्मेट वापर सक्तीचा करण्यात येणार आहे. नियम तोडणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिला आहे.

advertisement

शहरातील ज्या भागात आतापर्यंत अधिक अपघात घडतात तिथं विशेष लक्ष दिले जाणार आहे. वाहतूक पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका यांच्या माध्यमातून रस्ते सुधारणा केली जाणार आहे. पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंग, सुरक्षित पदपथ आणि योग्य प्रकाशयोजना यावर भर दिला जाईल.

अपघात रोखण्यासाठी महत्त्वाच्या मार्गावर कडक कारवाई

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्ष शेतीचा घेतला धाडसी निर्णय, शेतकऱ्याचं नशीब पालटलं, 30 लाख नफा!
सर्व पहा

ठाणे-भिवंडी-पडघा-शहापूर मार्गावर विशेष मोहीम राबवण्यात येणार असून वेगमर्यादा तपासण्यासाठी रडारयुक्त इंटरसेप्टर वाहने तैनात केली जातील. सुरक्षित आणि जबाबदार वाहनचालकत्वातूनच अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते, असे प्रशासनाचे मत आहे.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
Traffic Rules : वाहनचालकांनो सावधान! ही एक चूक तुम्हाला भारी पडणार; परिवहन विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल