नेमके काय घडलं होते?
मिळालेल्या माहितीनुसार,7 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात मानसिकदृष्टा विचलित अवस्थेत हा तरुण दिसून आलेला होता.नंतर पोलिसांनी या तरुणाला उपचारासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करुन त्याच्यावर उपचार सुरु केले. सुरुवातील मौन अवस्थेत असलेल्या तरुणाशी रुग्णायलातील कर्मचाऱ्यांनी वारंवार संवाध साधण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याने काही दिवसांनी त्याचे नाव सांगून तो बिहारमधील छपरा जिल्ह्यातील असल्याचे सांगितले. त्यानंतर तातडीने समाजसेवा अधिक्षक सतीश वाघ यांनी बिहार पोलिसांशी संपर्क साधून दाऊदपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुंदन कुमारयांच्याशी समन्वय साधला. या तपासादरम्यान सर्वांसमोर एक महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे या तरुणाचे कुटुंब सध्या बिहारमध्ये राहत नसून दिल्लीत स्थायिक झाले होते.
advertisement
सोशल मीडिया ठरला 'देवदूत'
पोलिसांनी या बेपत्ता तरुणाचा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारिक केले. काही दिवसांनतर ही माहिती आणि फोटो पाहून एका स्थानिक व्यक्तीने तरुणाच्या भावाचा रितेशचा संपर्क क्रमांक हा पोलिसांना मिळवून दिला.
अखेर बेपत्ता तरुणाची ओळख पटली
अखेर 13 जानेवारी रोजी व्हिडिओ कॉलद्वारे बेपत्ता झालेल्या तरुणाची ओळख पटवण्यात आली. पण त्यावेळी तो तरुण पू्र्णपणे बरा नसल्याने डॉक्टरांनी उपचार केले आणि त्याची प्रकृती सुधारल्यानंतरचा त्याचा भाऊ रितेश रुग्णालयात आणि दोघांची भेट झाली.
