त्या रात्री काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातील रुपादेवी पाडा परिसरातील ही घटना आहे. या परिसरात राहणारी 15 वर्षीय मुलगी ही 10 मार्च रोजी रात्री काही काम असल्याचे सांगून बाहेर पडली. पण बरेच तास उलटूनही ती घरी परतली नाही,त्यामुळे घरच्यांची तिंचा वाढू लागली. सुरुवातीस मुलगीचा पत्ता न लागल्याने तिच्या कुटुंबियांनी परिसरात शोधाशोध सुरु केली.
advertisement
नातेवाईक अन् मित्र-मैत्रिणींकडेही पत्ता लागेना
परिसरात पाहून झाल्यानंतर तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या घरी शिवाय काही जवळच्या नातेवाइकांकडे चौकशी केली. पण सर्व प्रयत्न करुनही तिचा तपास कुठे लागला नसल्याने कुटुंबियांची चिंता अधिक वाढली. शेवटी जाऊन त्यांनी श्रीनगर पोलिस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली.
मुलीच्या कुटुंबियांची तक्रार मिळताच पोलिसांनीही तातडीने तपास सुरु केला. पोलिसांनी तिच्या परिसरातील माहिती गोळा करताना मुलगी ही तिच्या एका मैत्रिणीकडे गेल्याचे समोर आले असून ती त्या ठिकाणी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.
सुरक्षिततेसाठी दिलेला दम मुलीला नडला
गेल्या काही दिवसांपूर्वी छेडछाड करणाऱ्या तरुणाविरोधात तक्रार करण्यासाठी मुलीचे वडील तिला सांगत होते. त्यातून वडिलांनी तिला ओरडल्याने तिच्या मनात राग भरला होता,या सर्व कारणांमुळे तिने घर सोडून मैत्रिणीकडे राहण्याचा निर्णय घेतला, असे पोलिस तपासात समोर आले.
