श्रीधर हे 6 नोव्हेंबर 2025 ला व्हॉटसअप न्याहाळत असताना त्यावेळी एका व्हॉटसअप ग्रुपमध्ये यांना समाविष्ट करण्यात आले. ग्रुपमध्ये नुकतीच ऑनलाइन ट्रेंडिंग इन्व्हेस्टमेंट सुरू होती. याच ग्रुपमधील सिया अरोरा हिने केचुरा सेक्युरिटीजमध्ये कामाला असल्याचे सांगितले. त्यानंतर तिने शेअर्समध्ये ऑनलाइन गुंतवणुकीची माहिती देत एक लिंकही त्यांच्या पर्सनल नंबरवर पाठवली.
कोकणवासीयांना गुड न्यूज, अवघ्या 7 तासांत मुंबईहून विजयदुर्ग, चेक करा रो-रो सेवा वेळापत्रक
advertisement
शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा मिळेल, असे तिने आमिष दाखवले. याच आमिषाला बळी पडत श्रीधर यांनी बँकांमधून 11 लाख 97 हजारांची गुंतवणूक केली. त्याव्यतिरिक्तही सिया हिने त्यांना आणखी दहा लाखांची रक्कम दलालीपोटी भरण्यास सांगितले. आणखी रक्कम भरण्यासाठी नसल्याने त्यांनी इतर सदस्यांना कॉल केले. तेव्हा त्यातील एकाही कॉलला त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर त्यांनी ठाण्यातील केचुरा सेक्युरिटीज या कंपनीला भेट दिली. मात्र, आपल्या कंपनीकडून व्हॉटसअपद्वारे कोणतीही माहिती किंवा गुंतवणुकीचे मार्गदर्शन केले जात नसल्याचे या कंपनीकडून त्यांना स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर 3 फेब्रुवारी रोजी त्यांनी सायबर विभागाकडे ऑनलाइन तक्रार केली. तसेच आमिषाला बळी पडलेल्या याप्रकरणी त्यांनी 25 फेब्रुवारी रोजी कापूरबावडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यानंतर संपूर्ण माहिती काढून पोलीस पुढील तपास करत आहेत.






