कौटुंबिक वादाचा भयकंर शेवट, नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कामतघर येथील एका अपार्टमेंटमध्ये जैस्वाल कुटुंब वास्तव्यास आहे. 3 नोव्हेंबर रोजी या कुटुंबातील बहिण आणि भावामध्ये वाद झाला यांची नाव रोहित (वय25)आणि गौरी अशी असून यांच्या वडिलांचे नवा अनंतराम जैस्वाल(वय45) असे आहे. रोहित आणि गौरीमध्ये सुरु झालेला वाद काही वेळात मोठ्या भांडणात बदलला. घरात सुरु असलेला हा वाद शांत करण्यासाठी अनंतराममध्ये पडले. पण वडील भाडंणाच्या मध्ये का पडले असा राग त्यांच्या मुलाला आला त्यात संतापलेल्या मुलाने वडिलांवर हल्ला केला.
advertisement
घरातील वादाची किंमत वडिलांना मोजावी लागली
रोहितने वडिलांना लोखंडी कड्याने त्यांच्या डोक्यावर आणि शरीरावर बेदम मारहाण केली. या हल्ल्यात अनंतराम रक्तबंबाळ झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखलही करण्यात आलं. मुलाकडून झालेल्या या हल्ल्यामुळे केवळ वडीलच नव्हे तर संपूर्ण कुटुंब हादरलं आहे.
या घटनेनंतर अनंतराम जैस्वाल यांनी नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपी मुलगा रोहित जैस्वालविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. वडिलांवरच हल्ला करणाऱ्या या मुलाच्या कृतीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
