TRENDING:

Shocking News : नवीन कार घेण्याचं स्वप्न, टेस्ट ड्राइव्हला गेले अन्..., कल्याणमधील कुटुंबासोबत अघटित घडलं

Last Updated:

Test Drive Car Accident : ठाणे शहरात एक अतिशय भयानक प्रकार घडलेला आहे. जिथे एका कुटुंबाच स्वप्न पूर्ण होण्याआधीच संपंल आहे. नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : नवीन कार घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. लाखोजण हे सत्त्यातही उतरवतात. पण कल्याणमध्ये राहणाऱ्या काही नागरिकांचे हे स्वप्न अतिशय भयानक परिस्थिती बदललेले आहे.
Thane Pachpakhadi accident
Thane Pachpakhadi accident
advertisement

शोरूमची टेस्ट ड्राइव्ह पडली महागात

ठाणे शहरातील नामांकित पाचपाखाडी परिसरात मंगळवारी सायंकाळी एक धक्कादायक अपघात घडला. शोरूममधील नवीन कारची टेस्ट ड्राइव्ह करताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार सुमारे 20 फूट खोल खड्ड्यात पडली. या अपघातात तीन जण जखमी झाले असून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुमारी प्रिया (वय36), मिथिलेश पासवान (वय48) आणि चेतन देशमुख (वय30) अशी जखमींची नावे आहेत. मिथिलेश पासवान आणि कुमारी प्रिया हे कल्याण येथे राहतात. त्यांनी मंगळवारी संध्याकाळी साधारण साडेसातच्या सुमारास शोरूममध्ये जाऊन नवीन कारची टेस्ट ड्राइव्ह करण्याची विनंती केली होती.

advertisement

त्यावेळी शोरूममधील कर्मचारी चेतन देशमुख यांनी त्यांना कारमध्ये बसवून परिसरात फेरफटका मारण्यासाठी नेले. मात्र पाचपाखाडी परिसरात जात असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या इमारत बांधकामासाठी खोदलेल्या सुमारे 20 फूट खोल खड्ड्यात जाऊन पडली.

मोठा अनर्थ टळला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

या अपघाताच्या वेळी कारने रस्त्यावरील इतर तीन वाहनांनाही धडक दिली. त्यामुळे त्या वाहनांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने कारमधील सुरक्षा यंत्रणा वेळेवर सुरु झाल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत मिथिलेश पासवान आणि चेतन देशमुख यांना किरकोळ दुखापत झाली. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
Shocking News : नवीन कार घेण्याचं स्वप्न, टेस्ट ड्राइव्हला गेले अन्..., कल्याणमधील कुटुंबासोबत अघटित घडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल