TRENDING:

Badlapur News: थेट लोकवस्तीत घुसून हल्ला, बदलापुरात बिबट्याची दहशत, काय घडलं?

Last Updated:

Leopard: ग्रामीण भागात दहशत निर्माण केल्यानंतर ठाण्यासह शहरी भागात देखील बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वन्यप्राण्यांनी जंगल सोडून मानवी वस्तीत प्रवेश केला आहे. ग्रामीण भागात बिबट्याची दहशत वाढली असतानाच शहरात देखील बिबट्याचा वावर वाढला आहे. ठाणे जिल्ह्यासह कल्याण, मुरबाड आणि बदलापूर शहरात देखील बिबट्याची दहशत वाढली असून रात्रीअपरात्री बाहेर पडणे भीतीचे ठरत आहे. बदलापूरच्या आंबेशिव, कारवापाठोपाठ आता वांगणी गावात बिबट्या दिसल्याने भीतीचे वातावरण आहे.
Badlapur News: थेट लोकवस्तीत घुसून हल्ला, बदलापुरात बिबट्याची दहशत, काय घडलं?
Badlapur News: थेट लोकवस्तीत घुसून हल्ला, बदलापुरात बिबट्याची दहशत, काय घडलं?
advertisement

बदलापूर येथील वांगणी (काराव) परिसरात बिबट्याची दहशत वाढली आहे. शिवाजीनगर जुना भेंडी पाडा परिसरातील लोकवस्तीत घुसून बिबट्याने दोन कुत्र्यांची शिकार केली. भर लोकवस्तीत घुसून बिबट्याने कुत्र्यांवर हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याने कुत्र्यांवर हल्ला केल्याचे समजताच वन विभागाचे पथक वांगणी गावात दाखल झाले. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

advertisement

Thane: पोखरण रोड परिसरातील सोसायटीत बिबट्या, ‘त्या’ Video ने वाढवलं टेन्शन

वांगणी आणि इतर परिसरात एक मादी बिबट्या आणि दोन बछडे दिसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ढोके दापिवली, पिंपकोळी तर ठाणे जिल्ह्यात वारली पाड्यातील परिसरात शुक्रवारी बिबट्या दिसला. त्यामुळे या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. ठाणे वनविभागाने तीन ट्रॅप आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावूनही हा बिबट्या अद्याप अडकलेला नाही. वनविभागाकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

advertisement

नागरिकांसाठी सूचना:

रात्रीच्या वेळी जंगलाजवळ किंवा दाट झाडीच्या परिसरात जाणे टाळा.

पाळीव प्राण्यांची काळजी घ्या आणि त्यांना घराबाहेर एकटे सोडू नका.

बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभाग किंवा स्थानिक पोलिसांना माहिती द्या.

काय काळजी घ्यावी (बिबट्या दिसल्यास):

शांत राहा: घाबरू नका आणि पळू नका, कारण बिबट्या वेगाने पळतो.

मोठे दिसा: हात वर करा, मोठा आवाज करा, काठी किंवा टॉर्चचा वापर करा.

advertisement

हळू हळू मागे सरका: पाठ दाखवू नका आणि हळू हळू मागे फिरा.

वनविभागाला कळवा: त्वरित 1926 वर फोन करून माहिती द्या.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शनिवारी डाळिंबाला उच्चांकी भाव, शेवग्याचं मार्केट हाललं, गुळाचे दर काय?
सर्व पहा

गर्दी करू नका: बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी करू नका.

मराठी बातम्या/ठाणे/
Badlapur News: थेट लोकवस्तीत घुसून हल्ला, बदलापुरात बिबट्याची दहशत, काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल