पोलिसांना रविवारी मिळालेल्या एका माहितीच्या माध्यमातून, ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरामध्ये पोलिसांनी एका फूटपाथवर सापळा रचून अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. त्याची झाडाझडती घेतली असता पोलिसांना त्याकडे दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे मिळाले. ज्याची सध्याची किंमत 2 लाख 14 हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये अल्पवयीन मुलाकडे पिस्तुल बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नव्हता. त्याकडे सर्व अवैध शस्त्रात्रेच होते. महत्त्वाचं म्हणजे, तो हे शस्त्रात्र अवैध विकण्याच्या तयारीत होता, अशी माहिती खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे यांनी दिली.
advertisement
कोणताही परवाना नसताना शस्त्रात्रे बाळगणारा हा अल्पवयीन मुलगा मुळचा उत्तर प्रदेशातील आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशातल्या चित्रकुटमधील आहे. सध्या मुलाला ठाणे पोलिसांकडून होम रिमांडमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. असे वृत्त पीटीआयने दिले आहे. पोलिसांकडून या मुलाचे वय स्पष्ट करण्यात आले नाही. दरम्यान, ठाणे पोलिसांनी या अल्पवयीन मुलावर शस्त्रास्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक तरमाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "शस्त्रांचा साठा शोधण्यासाठी आणि शस्त्रांच्या बेकायदेशीर खरेदी आणि विक्रीमध्ये सहभागी असलेल्या नेटवर्कची ओळख पटवण्याचे तपास सुरू आहे."
