सर्व काही सुरळीत होतं, पण..
ठाणे शहरातील वाघबीळ परिसरात राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेने पती आणि सासूविरोधात छळाची तक्रार दाखल केली आहे. मूल होत नसल्याच्या कारणावरून तसेच घरगुती वादातून तिला सतत मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. कासारवडवली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
महिलेचे माहेर भंडारा येथे असून सासर नाशिक येथे आहे. मॅट्रिमोनी संकेतस्थळावरून साधारण 2018 मध्ये तिची आणि एका तरुणाशी झाली. त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने 8 फेब्रुवारी 2019 रोजी भंडारा येथे त्यांचे लग्नही पार पडले. लग्नानंतर काही दिवस नाशिक येथे आणि नंतर ठाण्यातील साकेत परिसरात ते राहू लागले.
advertisement
सुरळीत संसारात वादाची ठिणगी
लग्न झाल सर्व काही सुरळीत सुरु होत आणि त्यातच त्यांनी लग्नानंतर तीन वर्षांनी मूल होऊ द्यायचे असा दोघांचा निर्णय होता. मात्र, सासूकडून सतत मूल होत नसल्याबाबत टोमणे मारले जात होते.पण त्यात नवऱ्यानेही तिला त्रास देण्यास सुरुवात केली.2020 ते डिसेंबर 2022 दरम्यान पती आणि सासू यांनी वाद घालून, अपशब्द बोलून आणि मानसिक दबाव टाकून त्रास दिल्याचे महिलेने तक्रारीत सांगितले गेले आहे.
आता थेट घटस्फोटाचा दावा
याशिवाय पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. या सर्व प्रकाराला कंटाळून महिलेने अखेर पोलिसांत धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
