मुंब्रा-कल्याण फाटा दरम्यान तीन पुलांची भेट
मुंब्रा परिसरात जुना मुंबई-पुणे महामार्गाच्या असलेल्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वसी असून शाळा आणि बाजारपेठा आणि व्यावयायिक ऑफिसेस आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे हा मार्ग पुढे तळोजा, पनवेल आणि जेएनपीटीकडे वळतो त्यामुळे या मार्गावर कंटेनर-मालवाहू वाहनांची वर्दळ सुर असते आणि या रुंद महामार्गावर नागरिकांना रस्ता ओलांडणे अत्यंत धोकादायक ठरत आहे.
advertisement
त्यामुळेच मुंब्रा शहरातून जाणाऱ्या जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तीन ठिकाणी पादचारी पूल उभारण्याचा प्रस्ताव ठाणे पालिकेने तयार केला आहे.
कसा असेल हा पूल?
जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर प्रस्तावित प्रत्येक पादचारी पूल हे सुमारे 60 मीटर लांबीचा आणि 4 मीटर रुंदीचे असून त्यांच्या दोन्ही बाजूंना चढ-उतारासाठी जिना आणि रॅम्पची सुविधा असेल. महत्त्वाचे म्हणजे या तीन पुलांच्या बांधकामासाठी येणार खर्च अंदाजे हा 27 कोटी 72 लाख रुपयांचा असेल.
