पालघर दुर्घटनेतील 'त्या' गूढ रात्रीचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर रेल्वे स्थानकाजवळी जैन मंदिरातजवळ ही घटना घडली. घडलेल्या या दुर्घटनेत 23 वर्षीय स्वप्नील पालांडे तर 23 वर्षीय कुणाल कुमार दुबळा आणि 28 वर्षीय अफरोज खलील शेख या तीन तरुणांचा दुर्देवी मृ्त्यू झालेला असून तिन्ही तरुण ही पालघरच्या वीरेंद्र नगर येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आलेली आहे.
advertisement
कुटुंबियांचे आरोप काय?
घटनेच्या रात्री हे तरुण रेल्वे परिसरात बसले होते. त्या दरम्यान काही पोलिस सिव्हिल कपड्यांमध्ये तेथे आले आणि तरुणांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली, असा आरोप मृत तरुणांच्या कुटुंबियांनी केला आहे. मात्र त्याच दरम्यान सुरु असलेल्या गोंधळात तरुण रेल्वे रुळावरुन पळू लागले आणि रुळावर वेगाने येणाऱ्या मालगाडीची तरुणांना धडक बसली ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान पोलिसांनी कुटुंबियांना दिलेल्या माहितीनुसार, तिघा तरुणांनी मालगाडीसमोर येऊन आपले जीवन संपवले असल्याचा दावा करण्यात आला. मात्र पोलिसांचा हा दावा कुटुंबियांनी फेटाळून लावला असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
