वृद्धाचा संतापजनक प्रकार उघड
मिळालेल्या माहितीनुसार,ही घटना १२ जानेवारी रोजी घडली. पीडित मुलगी घरगुती गरजेसाठी काही पैसे उसने मागण्यासाठी आरोपीच्या दुकानात गेली होती. पीडित मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असूनही आरोपीच्या मनात पाप आले. त्यावेळी दुकानात दुसरे कोणीही नसल्याची संधी साधून या 63 वर्षीय नराधमाने तिला जवळ बोलावले आणि तिचा विनयभंग केला.
advertisement
या भयानक प्रकारानंतर आरोपीने मुलीला काही पैसे दिले पण सोबतच एक अट घातली ''जर याबद्दल कोणाला काही सांगितले, तर तुला जीवे मारून टाकेन'' अशी धमकी त्याने त्या मुलीला दिली. या धमकीमुळे मुलगी प्रचंड घाबरली होती. मात्र तिने हिंमत दाखवून हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. आपल्या मुलीसोबत घडलेला हा प्रकार ऐकून पालकांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने विरार पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली.
पालकांच्या तक्रारीवरून विरार पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाने अशा प्रकारचे नीच कृत्य केल्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या विरार पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
