नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातील एक जोडप्यांच्या घटस्फोटाचा दावा न्यायालयात सुरु आहे, त्यामुळे ते काही महिन्यांपासून वेगळे राहत होते. त्यातील महिला ही कशेळी येथे राहत असून तिचा नवरा वागळे इस्टेट परिसरात राहतो आणि यांना एक 12 वर्षाचा मुलगाही आहे जो वडिलांसोबत आणि त्यांच्या आजीसोबत राहतो.
पतीच्या घरी गेली अन्...
advertisement
दरम्यान 11 मार्च च्या रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास महिला पतीच्या घरी पोहचली. तेथे तिने मुलाला ''माझ्या सोबत राहण्यासाठी का येत नाही..? 'असा विचारले. मात्र त्यावर तिच्या मुलाने नकार दिला. त्यानंतर ती संतापवली आणि मुलाला मारहाण केली.
घटनेवेळी घरात महिलेची सासू उपस्थित होती त्यामुळे तिने वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. पण रागात असलेल्या महिलेने सासूला शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचे सांगितले जात आहे. सध्या या घटनेची तक्रार श्रीनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केलेला आहे.
