शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असो, नोकरीसाठी अर्ज करायचा असो, आधार कार्ड शिवाय कोणतंही काम पूर्ण होत नाही.
म्हणूनच, आधार कार्डमधली माहिती नेहमी अपडेट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. विशेषतः पत्ता बदलला असेल, तर तो वेळेत अपडेट केला नाही, तर सरकारी सेवा घेणं कठीण होऊ शकतं.
पत्ता बदलला आहे? मग लगेच करा अपडेट
advertisement
कधी घर बदलतो, कधी शहर आणि मग अनेक कागदपत्रांमध्ये जुनाच पत्ता राहतो. पण आधार कार्डमधील पत्ता योग्य नसला, तर बरंचसं काम अडकू शकतं.
पण चांगली बातमी ही आहे की, UIDAI ने 14 जून 2025 पर्यंत आधार अपडेट करण्यासाठीची अंतिम तारीख दिली आहे आणि हो ऑनलाइन पद्धतीने पत्ता अपडेट करणं सध्या फ्री आहे.
पण हे अपडेट कसं करायचं हे अनेकांना माहित नाही, ज्यामुळे लोक थोडे गोंधळतात. पण आज आम्ही तुम्हाला गाइड करणार आहोत, जेणेकरुन ही प्रोसोस थोडी सोपी होईल.
आधार कार्ड अपडेट करण्याचे दोन मार्ग आहेत:
1. ऑनलाइन पद्धत – फ्री आणि सोपी!
जर तुमच्याकडे इंटरनेट आणि मोबाइल आहे, तर घरबसल्या आधार अपडेट करू शकता:
UIDAI च्या वेबसाइटवर जा
तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाका
नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका
"Update Address in Aadhaar" या पर्यायावर क्लिक करा
नवीन पत्ता भरून, आधारसाठी मान्य असलेलं पत्त्याचं डॉक्युमेंट (जसं की पासपोर्ट, वीज बिल, बँक स्टेटमेंट) अपलोड करा
सर्व माहिती नीट तपासा आणि सबमिट करा
सबमिट केल्यानंतर SRN (Service Request Number) मिळेल याच्या मदतीनं स्टेटस ट्रॅक करता येईल
हे सगळं पूर्णपणे मोफत आहे.
2. ऑफलाइन पद्धत – जवळच्या आधार केंद्रावर जा
जर ऑनलाइन करणं शक्य नसेल, तर जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जाऊन अपडेट करता येतं:
UIDAI च्या वेबसाइटवरून जवळचं आधार केंद्र शोधा
केंद्रावर जाऊन 'आधार अपडेट फॉर्म' भरावा
पत्त्याचा पुरावा (जसं की ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, वीज बिल) घेऊन जा
बायोमेट्रिक तपासणी केली जाईल
यासाठी ₹50 शुल्क लागेल
तुम्हाला URN (Update Request Number) मिळेल – याच्या साहाय्याने अपडेट स्टेटस पाहता येईल
पत्त्यासाठी कोणती डॉक्युमेंट्स चालतात?
पासपोर्ट
बँक स्टेटमेंट/पासबुक
मतदार ओळखपत्र
ड्रायव्हिंग लायसन्स
वीज/पाणी/टेलिफोन बिल
रेशन कार्ड
पेन्शन कार्ड
मालमत्ता कराची पावती
UIDAI ने स्पष्ट सांगितलं आहे की, 14 जून 2025 ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे वेळ गमावू नका. लवकरात लवकर तुमचं आधार अपडेट करा आणि सरकारी योजनांमध्ये अडथळा टाळा.