तुम्ही हे लोकांना बोलताना ऐकलंच असेल की, उन्हाळ्यात गाडीच्या इंधनाची टाकी फुल करायची नाही. पण असं का म्हटलं जातं आणि हे कितपत खरं आहे? चला जाणून घेऊ.
1. तापमान वाढल्याने पेट्रोलचं विस्तार होतं
उन्हाळ्यात तापमान वाढल्याने पेट्रोल आणि डिझेल गरम होऊन त्याचा विस्तार होतो. त्यामुळे टाकी पूर्ण भरली असेल तर इंधनाचा दाब वाढू शकतो आणि वायू उत्सर्जन जास्त होऊ शकतं.
advertisement
2. पेट्रोलचं लवकर बाष्पीभवन होतं
उन्हाळ्यात जास्त उष्णतेमुळे पेट्रोल वेगाने बाष्पीभवन होतं. त्यामुळे शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी इंधन भरावं, जेणेकरून उष्णतेचा परिणाम कमी होईल.
गाडीच्या इंधन टाकीत जागा ठेवणे का गरजेचं?
पेट्रोल किंवा डिझेल फुल भरल्यानंतर जर उष्णतेमुळे त्याचा विस्तार झाला, तर त्याचा अतिरिक्त दाब निर्माण होतो. त्यामुळे टाकीत थोडी जागा ठेवणं सुरक्षित मानलं जातं.
आता तुम्हाला कळलंच असेल की टाकी न फुल करण्याचे फायदे. आता गाड्यां आणि उन्हाळ्याशी संबंधीत काही मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते खालीलप्रमाणे
इंधन भरण्याची योग्य वेळ कोणती?
सकाळी किंवा रात्री इंधन भरणे उत्तम पर्याय आहे. यावेळी तापमान कमी असल्याने पेट्रोल कमी बाष्पीभवन होतं आणि योग्य प्रमाणात मिळतं.
गाडी जास्त वेळ उन्हात उभी असल्यास इंधनाचे बाष्पीभवन वाढते. त्यामुळे शक्य असल्यास सावलीत किंवा छताखाली गाडी पार्क करा.
तर आता तुम्ही समजलात ना? उन्हाळ्यात गाडीचं पेट्रोल टाकी फुल भरण्याचा निर्णय काळजीपूर्वक घ्या.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी त्याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)