अमरावती: अमरावती जिल्ह्यात वरूड तालुक्यातील काही गावांमध्ये लष्करी वालाचे उत्पादन घेतले जाते. लष्करी वालाचे दाणे अतिशय पौष्टिक असतात. याच दाण्यांना चित्रांगी दाणे, दूध मोगऱ्याचे दाणे या नावानेही ओळखले जाते. वरूड तालुक्यातील प्रत्येक घरी वर्षभरातून एकदा तरी या दाण्याची भाजी बनवली जाते. चित्रांगी दाण्याची भाजी कशी बनवायची? त्याची रेसिपी अमरावतीच्या गृहिणी मंदा बहुरूपी यांनी सांगितली आहे.