
अमरावती : हिवाळ्यामध्ये पौष्टीक पदार्थ सेवन करण्यासाठी डॉक्टर सल्ला देतात. सद्यस्थितीमध्ये आहारातून ज्वारी, बाजरी आणि त्यासारखेच काही पदार्थ बाद झाले आहेत. पण, ते पौष्टीक असल्याने आहारात घेणे आवश्यक आहे. बाजरी हा पदार्थ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे बाजरीची चटपटीत खिचडी तुम्ही आहारात घेऊ शकता. ती कशी बनवायची याबद्दलच अमरावतीमधील गृहिणी जया भोंडे यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: Dec 27, 2025, 16:59 ISTबिबट्याची दहशत सगळीकडेच मोठ्या प्रमाणात दिसत आहे. बिबट्या आता मानवी वस्तीत शिरताना पाहायला मिळतो आहे. त्यातच हल्ली दिंडोरीच्या मुरकुटे गावात बिबट्याने धुमाकुळ घातला होता.तेव्हा बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.वनविभागाने शेतात पिंजरा लावून त्याला जेरबंद केले.
Last Updated: Dec 27, 2025, 20:23 ISTमुंबई: शिक्षण, नोकरी आणि आवड यांचा समतोल साधत अनेक तरुण आज नव्या वाटा शोधत आहेत. त्याच प्रवाहात आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या दिव्याने आपल्या आवडीला व्यावसायिक रूप देत स्वत:चा महाराष्ट्रीयन ज्वेलरीचा व्यवसाय सुरू केला आहे. दिव्याने बीएससी आयटीमधून पदवी शिक्षण पूर्ण केले असून सध्या ती आयटी क्षेत्रात नोकरी करत आहे. मात्र नोकरीपुरतीच मर्यादित न राहता, तिने आपल्या सर्जनशीलतेला संधी देत पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्यांच्या व्यवसायात पाऊल टाकले.
Last Updated: Dec 27, 2025, 19:54 ISTखोपोलीतील मंगेश काळोखे यांच्या हत्येचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर आला आहे. ते शाळेत मुलीला सोडायला गेले होते. घरी परतत असताना त्यांच्या पाठीमागे येऊन हल्लेखोरांनी हल्ला केला. शिवसेना(शिंदे गट) आमदार महेंद्र थोरवे म्हणाले," पोलीसांचं पथक या आरोपींचा शोध घेत आहेत."
Last Updated: Dec 27, 2025, 19:44 ISTजळगाव : जळगाव हे सोन्याच्या शुद्धतेसाठी तर जिल्हा कापूस आणि केळीच्या भांडारासाठी प्रसिद्ध आहे. खान्देशचा भाग असलेल्या जळगावकरांच्या जिभेचे चोचले पुरविणाऱ्या काही पदार्थांची चव लयभारी असते. त्यापैकीच जळगावातील अस्सल मेनूची सुरुवात होते ती भरताच्या वांग्यापासून. खान्देशात भरीतासोबत पारंपरिक खाद्य म्हणजे कळण्याची भाकरी खाल्ली जाते. बऱ्याच वेळा हिवाळ्यात भरीत पार्ट्या रंगतात तेव्हा कळण्याची भाकर आणि कोशिंबीर असा बेत असतो. विशेषतः पाहुणे मंडळी आल्यावर त्यांना भरीताचा आस्वाद आवर्जून देतात. याच भरीताची रेसिपी कशी करायची याबद्दल आपल्याला गृहिणी जागृती चौधरी यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: Dec 27, 2025, 19:19 ISTकुंभमेळ्यासाठी नाशिक मधील तपोवन परिसरात साधूग्राम उभारण्याची घोषणा झाली. त्यासाठी 1800 झाडे तोडणार आहेत. याकारणास्तव पर्यावरणवाद्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यातच आता शिवसेना (उबाठा) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी नाशिक येथील तपोवनाला भेट दिली आहे.तेव्हा ते म्हणाले, "आमचा कुंभमेळ्याला विरोध नाही.तपोवनातील झाडं कापण्याला आमचा विरोध कायम असेल,"
Last Updated: Dec 27, 2025, 19:17 IST