अमरावती: हिवाळ्यात चेहऱ्याची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. कारण त्वचा कोरडी होत असल्याने विविध त्वचेचे आजार जोर धरतात. त्यामुळे आपलं डेली रूटीन हे ठरलेलं असणे महत्त्वाचं आहे. पण, हिवाळ्यात चेहऱ्याची काळजी घ्यायची म्हटलं तर अनेकजण वारंवार चेहरा धुणे, चेहऱ्याला विविध प्रॉडक्ट लावणे अशा चुका करतात. यामुळे चेहरा आणखी खराब होतो आणि त्रास वाढतो. त्यामुळे डेली रूटीनमध्ये कोणत्या चुका टाळाव्यात, हे माहिती असणे गरजेचे आहे. याबाबत माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.