अमरावती: हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्यामुळे खाज येणे, बारीक पुरळ येणे, ओठ आणि टाचांना भेगा पडणे, अशा समस्या अनेकांना होतात. या समस्यांवर बाजारातील वेगवेगळे प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणात वापरले जातात मात्र त्याचा परिणाम तात्पुरता जाणवतो. मग यावर उपाय नेमका काय करायचा? तर गाईचे तूप आहारात घेतल्याने या समस्या आपण कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. गाईचे तूप हे त्वचेला आतून पोषण देते. त्यामुळे त्वचा सतेज राहते आणि विविध समस्या निर्माण होत नाहीत. हिवाळ्यात गाईचे तूप दररोज आहारात घेतल्याने त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. आणखी त्वचेला काय फायदे होतात त्याबाबत माहिती जाणून घेऊया.