
अमरावती : लग्नसराईचा सिझन सुरू आहे. त्यामुळे महिला आपल्या सौंदर्याबाबत विशेष काळजी करतात. अनेक वेळा पार्लरमधून नवनवीन प्रॉडक्ट वापरून मेकअप करतात. पण, मेकअप करण्यासाठी सुद्धा आपली स्किन क्लिअर आणि सतेज असावी लागते. त्यासाठी आपला आहार आणि काही दैनंदिन सवयी सुद्धा व्यवस्थित असाव्या लागतात. चेहऱ्याची त्वचा सतेज आणि क्लिअर राहण्यासाठी काय करावं आणि काय करू नये? याबाबतची माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.