TRENDING:

Dombivli: सगळे झोपायच्या तयारी अन् अचानक वास यायला लागला, काही कळायच्या आत स्फोट, डोंबिवलीच्या सोसायटीतले PHOTOS

Last Updated:
. घरामध्ये रात्री १२ वाजेच्या सुमारास सगळे जण झोपण्याची तयारी करत होते. त्यावेळे गॅस गळत झाली होती.
advertisement
1/7
सगळे झोपायच्या तयारी अन् अचानक वास यायला लागला, काही कळायच्या आत स्फोट PHOTOS
डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्व भागामध्ये एका सोसायटीमध्ये फ्लॅटमध्ये घरगुती गॅसची गळती झाली त्यामुळे भीषण स्फोट झाला. या स्फोटात ५ जण जखमी झाले आहे.
advertisement
2/7
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील नवनीत नगर संकुलात मध्यरात्री ही घटना घडली. या स्फोटामध्ये एकाच घरातील ५ जण जखमी झाले आहे. यामध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे.
advertisement
3/7
डोंबिवली पूर्वेतील नवनीत नगर संकुलात केतन देढिया यांच्या मालकीचा फ्लॅट आहे. घरामध्ये रात्री १२ वाजेच्या सुमारास सगळे जण झोपण्याची तयारी करत होते. त्यावेळे गॅस गळत झाली होती.
advertisement
4/7
घरात गॅस गळती झाल्यामुळे अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, घरातील दाराला लावलेली लोखंडी ग्रील तुटून गेली. खिडक्याची ग्रीलही तुटली.
advertisement
5/7
एवढंच नाहीतर घरातला एसी सुद्धा फुटला होता. या स्फोटामुळे घरामध्ये अतोनात नुकसान झालं होतं.
advertisement
6/7
या स्फोटामध्ये केतन देढिया (35), मेहुल वासाड( 40), विजय घोर (45), हरीश लोढाया (50) आणि पार्श्व हरीश लढाया (7) हे पाच जण जखमी झाले.
advertisement
7/7
घरमालक केतन देडिया हे सुमारे 50 टक्के भाजले असल्याने त्यांना उपचारार्थी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित किरकोळ जखमी यांना दवा उपचार करून घरी सोडून देण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Dombivli: सगळे झोपायच्या तयारी अन् अचानक वास यायला लागला, काही कळायच्या आत स्फोट, डोंबिवलीच्या सोसायटीतले PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल