बारामती लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात अजून एक पवार उतरणार आहेत. नणंदविरुद्ध भावजयच्या सामन्यात आता जावेचीही एन्ट्री झाली आहे. रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण हे कसं शक्य आहे? महाविकास आघाडीकडून आधीच सुप्रिया सुळे मैदानात असताना सुनंदा पवारांची गरज का पडली? काय सुरू आहे बारामतीच्या राजकारणात?