देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील 8 मतदारसंघात मतदान होईल. यापैकी परभणीच्या निवडणुकीकडे अनेकांचं लक्ष लागलंय. विद्यमान खासदार उबाठा गटाचे संजय जाधव आणि महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यात ही लढत आहे.