Balasaheb Thackeray Chhatrapati Sambhajinagar । 1988 साली बाळासाहेब ठाकरेंनी संभाजीनगरमध्ये “खान हवा की बाण हवा” असा नारा दिला. आणि एकहाती मुस्लीमांचा प्रभाव असलेला मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला बनला. तेव्हापासून ते आजतागयत, छत्रपती संभाजीनगरचं राजकारण याच नाऱ्यावर चालतंय. यंदा मात्र समीकरण बदललंय. आजवर ज्यांच्या हाती बाण होता त्यांनाच खानाला आवाहन करण्याची वेळ आलीय का? हा प्रश्न निर्माण झालाय. याला कारणीभूत ठरवलं जातंय ठाकरेंना. ठाकरे बदलणार का बाळासाहेबांचा नारा? काय घडतंय संभाजीनगरमध्ये?