महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणेंनी आज लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी राणेंनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दीपक केसरकर, रवींद्र चव्हाण, किरण सामंत, नितेश राणे यांच्यासह अनेक नेतेमंडळी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.