लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या तिकीटावर शाहू महाराज तर महायुतीकडून शिवसेनेच्या तिकीटावर संजय मंडलिक लढणार आहेत. दोघांनीही प्रचार सुरू केलाय. पण महायुतीच्या प्रचारसभेत संजय मंडलिक यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ज्यामुळे कोल्हापूरातील वातावरण तापण्याची चिन्ह आहेत.