पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाचही मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक उमेदवारांचं भवितव्य शुक्रवारी मतपेटीत बंद होणार आहे.