TRENDING:

हार्दिक पांड्याला मुंबईकरांचा सपोर्ट मिळणार? काय होणार वानखेडेवर?

Videos

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) यंदाच्या IPL सीझनमधील पहिलाच सामना होणार आहे. मुंबई इंडियन्ससाठीही (Mumbai Indians) घरच्या मैदानावरचा हा पहिलाच सामना ठरेल. यंदा पहिल्या दोन्ही सामन्यात मुंबईला पराभव स्वीकारावा लागला होता. पण घरच्या मैदानात नवा कॅप्टन हार्दिक पंड्या मुंबईचं खातं उघडणार का? रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) हार्दिकला कॅप्टन केल्यान मुंबईकर चाहते हार्दिकला सपोर्ट करणार का? पाहूयात थेट वानखेडे स्टेडियमवरुन स्पेशल रिपोर्ट...

Last Updated: Mar 31, 2024, 21:05 IST
Advertisement

सावधान! \'या\' राशींच्या लोकांना 2026 धोक्याचं, गुरुपीडेचा त्रास कमी करण्यासाठी ज्योतिषाचार्यांनी सांगितला \'हा\' रामबाण उपाय!

मुंबई: नवीन वर्ष सुरू व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे येणारं वर्ष आपल्यासाठी कसं असणार, कोणत्या राशीसाठी अनुकूल तर कोणत्या राशीसाठी थोडं आव्हानात्मक असणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीवरून वर्षाचा अंदाज घेतला जातो आणि त्यानुसार योग्य तयारी करता येते. येणाऱ्या 2026 या वर्षात तीन राशींना गुरुपीडेला सामोरे जावे लागणार आहे. ही माहिती दाते पंचांगानुसार देण्यात आली असून याबाबत ज्योतिषाचार्य आदित्य जोशी गुरुजी यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं आहे.

Last Updated: Dec 24, 2025, 18:34 IST

Pune News:"एका गोधडीत दडलंय 250 कुटुंबांचं नशीब!" पुण्याच्या भीमथडी जत्रेत राजगुरुनगरच्या महिलांची कमाल; हँडमेड गोधड्यांना तुफान मागणी!

पुणे

पुणे: विविध उद्योगांना एका ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी भीमथडी जत्रा सध्या पुण्यात सुरू आहे. पुण्यातील या जत्रेमुळे केवळ खाद्य आणि वस्त्र उद्योगालाच नव्हे तर ग्रामीण संस्कृती, लोककला आणि महिला उद्योजकतेलाही चालना मिळत आहे. या जत्रेमध्ये राज्यभरातील अनेक महिला बचत गट सहभागी झाले असून, त्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे. याच भीमथडी जत्रेमध्ये पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमधील दुर्गामाता महिला बचत गटाने सादर केलेल्या हँडमेड गोधड्यांनी विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

Last Updated: Dec 24, 2025, 18:01 IST
Advertisement

High Blood Pressure: सावधान! थंडी तुमच्या हृदयासाठी ठरू शकते घातक; उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी \\\\\\\'या\\\\\\\' चुका टाळाच!

सावधान! थंडी तुमच्या हृदयासाठी ठरू शकते घातक; उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी \'या\' चुका टाळाच!\r\n\r\nछत्रपती संभाजीनगर: शहरातील तापमानात सतत चढ-उतार होत असताना गेल्या दोन दिवसांपासून थंडीची लाट आली आहे. शहरातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. थंडीच्या दिवसांत रक्तदाब वाढू शकतो. थंडीमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे रक्तप्रवाहाला अधिक दाब लागतो. आधीच उच्च रक्तदाबाचा आजार आहे, त्यांच्यासाठी ही समस्या गंभीर ठरू शकते.\r\n

Last Updated: Dec 24, 2025, 17:39 IST

Christmas 2025 : काम सोडून ऑफिसमध्ये सण कशासाठी? \"कामाचा ताण आणि टीम वर्क...\" पाहा HR यांनी काय दिली माहिती!

पुणे

पुणे: सध्या सगळीकडे ख्रिसमस सणाची जोरदार तयारी सुरू आहे. बाजारपेठामध्ये देखील खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून ख्रिसमस हा सण दरवर्षी 25 डिसेंबरला साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधवांसाठी हा महत्त्वाचा सण मानला जातो.

Last Updated: Dec 24, 2025, 16:45 IST
Advertisement

"एक हातात बाळ, दुसऱ्या हातात बिझनेस!" घरोघरी जाऊन साड्यांची मार्केट रिसर्च करणाऱ्या मेघा नाईक; आज ७ लाखांची उलाढाल!

Success Story

नवी मुंबई: मेघा नाईक यांनी आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचा साड्यांचा व्यवसाय उभारला आहे. बारावी (कॉमर्स) पर्यंत शिक्षण झालेल्या मेघा नाईक यांचे लग्न कमी वयात झालं. त्यानंतर संसाराची जबाबदारी आणि मातृत्वाची नवी भूमिका स्वीकारत असतानाच त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. 2017 साली, अवघ्या सहा महिन्यांच्या लहान मुलाची आई असताना, मेघा नाईक यांनी साड्यांच्या व्यवसायात पाऊल ठेवले. या निर्णयामागे स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द होती. या प्रवासात त्यांना कुटुंबाचा आणि विशेषतः पतीचा मोलाचा पाठिंबा लाभला.

Last Updated: Dec 24, 2025, 16:22 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
हार्दिक पांड्याला मुंबईकरांचा सपोर्ट मिळणार? काय होणार वानखेडेवर? | N18V
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल