
जालना: सकाळी नाश्त्यासाठी नवीन काय करावे? असा प्रश्न बऱ्याचदा गृहिणींना पडत असतो. तुम्हाला देखील असा प्रश्न पडत असेल तर मराठवाडा स्टाईलने तयार केलेली दही धपाटे हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. दही धपाटे कसे तयार केले जातात? त्यासाठी कोणकोणते साहित्य लागते? हेच आपण जालना येथील गंगासागर लहू पडघणकर यांच्याकडून जाणून घेऊ.