जालना : गव्हाच्या पिठाची कणिक तयार करून ती फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय आजकाल अनेक घरांमध्ये दिसून येते. वेळेची बचत आणि सोयीस्करपणामुळे ही पद्धत लोकप्रिय झाली असली, तरी यामुळे आरोग्याला काही तोटे होऊ शकतात. फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक आणि त्यापासून बनवलेल्या चपात्या खाण्याने पचनसंस्था आणि एकूणच शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. फ्रिजमध्ये कणिक ठेवल्याने आरोग्यावर कोणते गंभीर परिणाम होऊ शकतात? याविषयीचं आहार सल्लागार डॉ. अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.