
कोल्हापूर : बऱ्याचदा महिलांना हिवाळ्यात दही लावण्याबद्दल प्रश्न निर्माण होतात. दररोज दह्याचे सेवन करणे हे आरोग्यासाठी चांगले असल्याचे म्हंटले जाते. मात्र थंडीच्या दिवसात वातावरण थंड असल्यामुळे घरी दही नीट लागत नाही किंवा दही तयार होण्यास जास्त कालावधी लागतो. याच सर्व बाबी लक्षात घेऊन कोल्हापूरच्या केतकी पाटील यांनी थंडीच्या दिवसात दही बनवण्यासाठी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. त्या स्वतः पाककलेच्या क्लास देखील घेतात.