मुंबई : दिवाळी जवळ आली की घराघरात फराळाचे तयारीचं उत्साहाचं वातावरण असतं. लाडू, चिवडा, करंजी यांच्या रांगेत एक खास आणि पारंपरिक पदार्थ खाऱ्या शंकरपाळ्या असतो. चहा सोबत अप्रतिम लागणाऱ्या आणि संपूर्ण कुटुंबाला आवडणाऱ्या या कुरकुरीत शंकरपाळ्या. गोडाच्या गर्दीत थोडा खारट स्वाद हवा असेल तर या खाऱ्या शंकरपाळ्या अगदी योग्य निवड आहे. पटकन होणारी, जास्त साहित्य न लागणारी आणि एकदा तयार केली की दिवसांचे दिवस टिकणारी ही डिश. तर चला तिची रेसिपी पाहुया.