मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनात झटपट बनणारा, चवदार आणि आरोग्यदायी नाश्ता हवा असतो. अशा वेळी ज्वारीचे धिरडे हा एक उत्तम पर्याय ठरतो. ज्वारी ही एक पारंपरिक आणि सुपरफूड म्हणता येईल ती पचायला हलकी, फायबरयुक्त आणि ग्लूटेन-फ्री आहे. ही रेसिपी केवळ 10-15 मिनिटांत तयार होते आणि त्यात भरपूर भाज्या घालता आल्यामुळे ती अजून पौष्टिक बनते. सकाळचा नाश्ता असो, डब्यातील खाणं असो, किंवा संध्याकाळचा हलका खाऊ ज्वारीचे धिरडे सर्वांसाठी परफेक्ट आहे.