TRENDING:

Hair Care : हिवाळ्यातल्या कोरडेपणानं केसांची चमक होते कमी, मुलायम रेशमी केसांसाठी अंड्याचे हेअर मास्क ठरतील उपयुक्त

Last Updated:

अंडी केसांसाठी अत्यंत उपयुक्त मानली जातात. त्यात प्रथिनं, बायोटिन आणि जीवनसत्त्वं भरपूर असतात. केस निरोगी राखण्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. शिवाय, केसांसाठी ते नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतात, ज्यामुळे केस गुळगुळीत आणि रेशमी राहतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : थोडा हिवाळा बाकी आहे अजून आणि या कोरड्या हवेत केसांच्या समस्यांनी त्रासला असाल तर ही माहिती नक्की वाचा. कारण हिवाळ्यात कोरडेपणामुळे त्वचा आणि केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. या काळात केस गळण्याचं आणि तुटण्याचं प्रमाण वाढतं. केस नेहमीसारखे दिसत नाहीत, चमक निघून गेल्यानं केस कोरडे आणि खूप निर्जीव दिसतात.
News18
News18
advertisement

कोरड्या झालेल्या केसांवर काही घरगुती उपचार अत्यंत प्रभावी मानले जातात. अंड वापरुन बनवलेले हेअर मास्क वापरुन पाहा. यामुळे केस चमकदार आणि रेशमी होतील.

Discipline : स्वातंत्र्य म्हणजे शिस्तही, शरीर-मनासाठी शिस्त का महत्त्वाची ?

अंडी केसांसाठी अत्यंत उपयुक्त मानली जातात. त्यात प्रथिनं, बायोटिन आणि जीवनसत्त्वं भरपूर असतात. केस निरोगी राखण्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. शिवाय, केसांसाठी ते नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतात, ज्यामुळे केस गुळगुळीत आणि रेशमी राहतात.

advertisement

अंडी आणि मधाचा हेअर मास्क - हिवाळ्यामुळे टाळू खूप कोरडा होऊ शकतो, ज्यामुळे कोंडा आणि केस गळण्याचं प्रमाण वाढतं. केस निरोगी राहावेत म्हणून मध आणि अंड्याचा हेअर मास्क लावू शकता. एका अंड्यात मध मिसळा. मिश्रण केसांवर वीस ते तीस मिनिटं ठेवा. नंतर, सौम्य शाम्पू आणि स्वच्छ पाण्यानं केस धुवा. यामुळे टाळू हायड्रेटेड राहिल आणि केसांची वाढ सुधारेल.

advertisement

Inadequate Sleep : चांगल्या आरोग्यासाठी झोप का आवश्यक, Beauty Sleep म्हणजे काय ?

अंडी आणि ऑलिव्ह ऑइल - केस गुळगुळीत, रेशमी व्हावेत यासाठी अंडी आणि ऑलिव्ह ऑइल हेअर मास्क देखील लावू शकता. एका अंड्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑइल मिसळा आणि पेस्ट तयार करा. हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा आणि अर्धा तास तसंच राहू द्या. नंतर कोमट पाण्यानं धुवा. यामुळे केस मॉइश्चरायझ होतील, केस गळणं कमी होईल आणि केसांची नैसर्गिक चमक टिकून राहील.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन आणि कांद्याच्या दरात पुन्हा घट, कपाशीला किती मिळाला भाव?
सर्व पहा

कोरफड आणि अंडी - केस गळती रोखण्यासाठी आणि केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी, कोरफड आणि अंडी वापरू शकता. कोरफडीचा ताजा गर घ्या आणि अंड्यात मिसळून पेस्ट बनवा. हे मिश्रण केसांवर अर्धा तास तसंच ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे केसांची मुळं मजबूत होतील आणि केस मऊशार होतील.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Care : हिवाळ्यातल्या कोरडेपणानं केसांची चमक होते कमी, मुलायम रेशमी केसांसाठी अंड्याचे हेअर मास्क ठरतील उपयुक्त
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल