advertisement

Discipline : रात्री उशिरापर्यंत जागणं आणि जंक फूड खाणं थांबवा, निरोगी जीवनासाठी शिस्त का आवश्यक ? जाणून घ्या आयुष मंत्रालयानं सांगितलेलं महत्त्व

Last Updated:

स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मनाप्रमाणे जगणं, आपल्याला हवं ते खाणं, रात्री उशिरापर्यंत जागणं आणि आपल्या शारीरिक गरजांकडे दुर्लक्ष करणं असं नाही तर, आरोग्याच्या बाबतीत खरं स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य नसून शिस्त आहे असा अर्थ आयुष मंत्रालयानं सांगितला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं त्यांनी यासंबंधीची पोस्ट शेअर केली आहे.

News18
News18
मुंबई : प्रजासत्ताक दिन म्हणजे राज्यघटनेनं दिलेली मूल्यं आणि लोकशाहीचं स्मरण. स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्यांचं स्मरण आणि राज्यघटना खऱ्या अर्थानं अस्तित्वात आली तो दिवस.
प्रजासत्ताक दिन म्हणजे केवळ राष्ट्रीय सण नाही तर आपल्या जीवनाचा, सवयींचा आणि जबाबदाऱ्यांचं स्मरण करण्याचा दिवस. या निमित्तानं, आयुष मंत्रालयानं आरोग्याला 'स्वातंत्र्याशी' जोडणारा एक गहन आणि प्रेरणादायी संदेश दिला आहे. त्याचा सारांश म्हणजे निरोगी जीवनासाठी शिस्त का आवश्यक आहे हे आयुष मंत्रालय स्पष्ट केलं आहे.
स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मनाप्रमाणे जगणं, आपल्याला हवं ते खाणं, रात्री उशिरापर्यंत जागणं आणि आपल्या शारीरिक गरजांकडे दुर्लक्ष करणं असं नाही तर, आरोग्याच्या बाबतीत खरं स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य नसून शिस्त आहे असा अर्थ आयुष मंत्रालयानं सांगितला आहे. आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी योग्य निवडी करायला शिकवणारी शिस्त. मंत्रालयाच्या मते, आपण वेळेवर झोपतो, ऋतूनुसार आणि ताजं अन्न खातो, नियमित व्यायाम आणि ध्यान करतो तेव्हाच आपण आजार, आळस आणि अशक्तपणापासून मुक्त होऊ शकतो. म्हणूनच रात्री उशिरापर्यंत जागणं आणि जंक फूड खाणं थांबवणं आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं.
advertisement
लहान, तात्कालिक सुखांपेक्षा दीर्घकालीन आरोग्य आणि चैतन्य यांना प्राधान्य देणं. स्वयंशिस्त म्हणजे आरोग्याला पूरक, आवश्यक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास शिकवते, प्रक्रिया केलेल्या अन्नापेक्षा हंगामी फळं आणि भाज्या निवडणं, विश्रांतीच्या नावाखाली निष्क्रिय राहण्याऐवजी सक्रिय राहणं आणि बेफिकीरपणे खाण्याऐवजी जाणीवपूर्वक खाणं आणि उशिरापर्यंत जागं राहण्याऐवजी वेळेवर झोपण्याची सवय लावणं.
advertisement
या सवयी सुरुवातीला लहान वाटू शकतात, परंतु दीर्घकाळात त्यांचा मोठा परिणाम होतो. आरोग्यदायी नागरिक हे एका मजबूत राष्ट्राचा पाया आहेत असं मंत्रालयाचं मत आहे. विशेषतः तरुणांनी आजपासूनच त्यांच्या दिनचर्येत छोटे शिस्तबद्ध बदल केले तर ते केवळ स्वतःला निरोगी ठेवू शकत नाहीत तर स्वावलंबी आणि ऊर्जावान भारताच्या उभारणीतही योगदान देऊ शकतात.
advertisement
चांगल्या आरोग्याचा पाया योग्य पोषण आणि नियमितता आहे. हंगामी आणि स्थानिक पदार्थांना प्राधान्य द्या, वेळेवर जेवण करा आणि कोमट पाणी पिण्याची सवय लावा. पारंपारिक आहार घ्या आणि हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळं आणि गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी आणि मका यांसारखी संपूर्ण धान्यं आहारात समाविष्ट करा. हे पोषक आणि नैसर्गिक घटक शरीराला बळकटी देतात.
advertisement
योग्य स्वयंपाक आणि खाण्याच्या सवयींसाठी महत्त्वाच्या टिप्स -
फळं आणि भाज्या वापरण्यापूर्वी पूर्ण व्यवस्थित धुवा. उकळवून, वाफवून किंवा ग्रिल करून अन्न पदार्थ तयार करा. तळलेले पदार्थ, साखर आणि मीठ जास्त असलेले पदार्थ आणि जंक फूड टाळा. नियमितपणे जेवण करा, जास्त खाणं टाळा आणि जेवताना फोन किंवा टीव्ही पाहणं टाळा. जेवणानंतर विश्रांती घ्या आणि दिवसभर भरपूर कोमट पाणी प्या. थोडक्यात, निरोगी जीवनासाठी शिस्त का आवश्यक आहे हे आयुष मंत्रालय स्पष्ट केलं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Discipline : रात्री उशिरापर्यंत जागणं आणि जंक फूड खाणं थांबवा, निरोगी जीवनासाठी शिस्त का आवश्यक ? जाणून घ्या आयुष मंत्रालयानं सांगितलेलं महत्त्व
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement