advertisement

फेब्रुवारीत बनतोय 'अशुभ ग्रहण योग', 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार संकटांचे वादळ; काय-काय सहन करावं लागणार?

Last Updated:

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची युती आणि राशी परिवर्तन जीवनावर खोलवर परिणाम करत असते. आगामी फेब्रुवारी 2026 महिना खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषीय दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठरणार आहे.

News18
News18
Grahan Yog : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची युती आणि राशी परिवर्तन जीवनावर खोलवर परिणाम करत असते. आगामी फेब्रुवारी 2026 महिना खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषीय दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठरणार आहे. या महिन्यात 17 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे 'सूर्यग्रहण' आणि ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे 'ग्रहण योग' निर्माण होत आहे. जेव्हा एखादा ग्रह राहु किंवा केतूच्या प्रभावाखाली येतो किंवा ग्रहणासारखी स्थिती निर्माण होते, तेव्हा त्याला 'ग्रहण योग' म्हटले जाते. या योगाचा अशुभ प्रभाव मानसिक, शारीरिक आणि आर्थिक स्तरावर जाणवतो. विशेषतः 3 राशींसाठी हा काळ परीक्षेचा ठरणार असून त्यांना अतिशय सावधगिरीने पावले टाकावी लागतील.
'या' 3 राशींसाठी फेब्रुवारी महिना ठरेल कठीण
मकर
फेब्रुवारी महिन्यात सूर्याचे संक्रमण मकर राशीतून कुंभ राशीत होणार असले, तरी ग्रहण योगाचा थेट परिणाम तुमच्या राशीवर दिसेल. या काळात तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. विशेषतः डोळे आणि पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. सरकारी कामात अडथळे येतील आणि वरिष्ठांशी तुमचे मतभेद होऊ शकतात. मकर राशीच्या लोकांनी या महिन्यात सूर्याला अर्घ्य देणे थांबवू नये आणि शनिवारी गरिबांना काळे तीळ दान करावेत.
advertisement
कुंभ
कुंभ राशीतच शनीचे भ्रमण सुरू आहे आणि त्यातच सूर्य आणि राहु-केतूच्या स्थितीमुळे ग्रहण योग अधिक प्रभावी ठरेल. तुमच्या मनात विनाकारण भीती आणि अस्वस्थता राहील. व्यवसायात भागीदारीत काम करणाऱ्यांनी कागदपत्रांची नीट तपासणी करावी, अन्यथा मोठी फसवणूक होऊ शकते. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या जातकांनी 'महामृत्युंजय मंत्राचा' जप करावा आणि शक्य असल्यास रुद्राभिषेक करावा.
advertisement
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीचा शेवटचा पंधरावडा आर्थिक बाबतीत चिंताजनक ठरू शकतो. खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त होतील, ज्यामुळे कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रू तुमच्या प्रतिमेला तडा लावण्याचा प्रयत्न करतील. प्रवासादरम्यान सामानाची आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दर गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे आणि कपाळावर केशरचा टिळा लावावा.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
फेब्रुवारीत बनतोय 'अशुभ ग्रहण योग', 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार संकटांचे वादळ; काय-काय सहन करावं लागणार?
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement