पुणे : सध्या राज्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. या काळात आणखी एक बदल जाणवत आहे तो म्हणजे आपली भूकही वाढत आहे. ही भूक वाढण्याचे कारण म्हणजे हिवाळ्यात थंड हवामानामुळे शरीराचे तापमान कमी होते. त्यामुळे शरीराला अधिक आहाराची गरज निर्माण होते. त्यामुळे थंडीत नेहमीपेक्षा आहारात थोडा बदल करावा, असा सल्ला आहार तज्ज्ञ देतात. याबाबतच आपण पुण्यातील आहार तज्ज्ञ डॉ. सचिन पवार यांच्याकडून जाणून घेऊ.



