डोंबिवली: सध्याच्या काळात अनेकजण खाद्य पदार्थांच्या व्यवसायाकडे वळत आहेत. अमृततुल्य चहाचे तर अनेक ब्रँड आपल्याला सर्वत्र दिसतात. पण डोंबिवलीतील एक मराठी जोडपं चक्क फ्लेवर्समध्ये चहा विकतंय. श्रुती आणि प्रेम कांबळे यांनी स्वत:चा टी ब्रँड सुरू केला असून ते तब्बल 15 हून अधिक प्रकारचे चहा विकत आहेत. विशेष म्हणजे गोल्डन अन् मसाला टीही विसरायला लावणारा हा चहा पिण्यासाठी ‘टी गार्डन’मध्ये नेहमीच गर्दी असते.



