
संध्याकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. अशा वेळी भजी आणि इतर तेलकट पदार्थ आपण बनवतो. पण, यालाच एक पर्याय म्हणून तुम्ही कमीत कमी वेळात तयार होणारा कच्चा चिवडा बनवू शकता. अगदी वेळेवर हा चिवडा तुम्ही बनवून खाऊ शकता. मुरमुरे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि इतर काही साहित्यापासून हा चिवडा तुम्ही बनवू शकता. याची रेसिपी अमरावतीच्या गृहिणी सारिका पापडकर यांनी सांगितली आहे.