पुणे: पुणे शहर आपल्या खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. मिसळ, पाणीपुरी, वडापाव, भेळ अशा असंख्य पदार्थांच्या एक वेगळी चव असून त्यामध्ये विविधता पाहिला मिळते. सदाशिव पेठ परिसरात सुरू झालेल्या भडंग खाण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. विशेष म्हणजे ही भेळ विकणारा तरुण म्हणजे एमबीए पदवीधर श्रीनाथ शिंदे, ज्याने आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या ऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.