अमरावती : सायंकाळच्या वेळी दररोज नाश्त्यासाठी काय बनवायचं? हा सर्वात मोठा प्रश्न गृहिणींना पडतो. कारण सायंकाळच्या वेळी हलका नाश्ता पाहिजे असतो. अशावेळी मग अनेक वेळा मॅगी, पोह्यांचा चिवडा यासारखे पदार्थ बनवले जातात. यावर एक ऑप्शन म्हणून तुम्ही मुरमुरे चिवडा बनवू शकता. अगदी कमीत कमी वेळात चटपटीत असा मुरमुरे चिवडा कसा बनवायचा? याची रेसिपी अमरावतीमधील जया भोंडे यांनी सांगितली आहे.